Ad will apear here
Next
सिंहगड स्पोर्ट्स करंडकचे उद्घाटन


पुणे : कुसगाव येथील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्‍या सिंहगड स्पोर्ट्स करंडकअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल स्टुडंट्स टूर्नामेंट सिंहगड इन्स्टिट्यूटच्या लोणावळा संकुलामध्ये झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी रियाझ बागवान यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी लोणावळा संकुलाचे संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, सिंहगड स्पोर्ट्स करंडकचे क्रीडा संचालक प्राचार्य डॉ. मिलिंद रोहकले यांसह महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य उपस्थित होते. पुणे विद्यापीठांतर्गत शिक्षण घेत असलेल्या सुदान, नेपाळ, श्रीलंका, इराक, अफगानिस्तान, येमेन व टांझानिया या देशातील एकूण २६० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल व व्हॉलीबॉल या प्रकारांमध्ये आयोजित केल्या आहेत.

पाच जानेवारीला झालेल्या मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान अ विरुद्ध अफगान लॉयन या सामन्यात अफगाणिस्तान अ संघाने १३ ओव्हरमधे आठ बाद १०२ धावा केल्या. अफगान लॉयन संघाने सहा बाद ९५ धावा केल्या. श्रीलंका विरुद्ध नेपाळ या सामन्यात श्रीलंका संघाने चार बाद ८४ धावा केल्या. नेपाळ संघाने आठ बाद ८१ धावा केल्या. मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत श्रीलंका विरुद्ध नेपाळ अशा झालेल्या सामन्यांत नेपाळ संघाने ४-१ असा विजय मिळविला.

मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत साउथ सुदान विरुद्ध नेपाळ या सामन्यात साउथ सुदान संघाने ३७-२१ असा विजय मिळविला. मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध साउथ सुदान या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने २-१ असा विजय मिळविला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZUQBW
Similar Posts
‘सिंहगड’मध्ये पुलवामातील शहीदांसाठी कॅन्डल मार्च कुसगाव : काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती असणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सिंहगड लोणावळा कॅम्पसच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी व प्राचार्यांनी उत्स्फूर्तपणे कॅन्डल मार्च काढला.
‘सिंहगड’मध्ये माजी विद्यार्थी रमले जुन्या आठवणींत कुसगाव : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या कुसगाव येथील एस.के.एन. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. उपस्थित विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’ने दिलेल्या ज्ञान व कौशल्याच्या शिदोरीवरच मार्गक्रमण करत असल्याचे सांगून ‘सिंहगड’विषयी कृतज्ञता व्यक्त केली
‘सिंहगड करंडक’अंतर्गत ‘टेकटॉनिक २०१९’ उत्साहात पुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस कुसगाव, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी यांमधील विद्यार्थ्यांनी ‘सिंहगड करंडक २०१९’च्या अंतर्गत ‘टेकटॉनिक २०१९’ या राज्यस्तरीय तंत्रज्ञानविषयक स्पर्धेचे
सिंहगड लोणावळा संकुलमध्ये शिवजयंती उत्साहात कुसगाव : येथील सिंहगड लोणावळा संकुलामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language